नागपूर : साहित्यभूषण लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त शनिवारी (ता.१) भारतीय जनता पार्टी तर्फे अभिवादन करण्यात आले. दीक्षाभूमी जवळील साहित्यभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक स्थळी भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून वंदन केले.
याप्रसंगी मनपा सत्ता पक्ष नेता संदीप जाधव, अनु. जाती मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोकराव मेंढे, अनु जाती मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुभाषजी पारधी, अनुसूचित जाती मोर्चाचे महामंत्री सतीश शिरसवान, मंडळ भाजपा अध्यक्ष किशोर वानखेडे, छोटू बोरीकर, आशिष पाठक, सचिन कारतकर, लखन येरावार, किशोर बेहाडे, शरद जाधव, शंकरराव वानखेडे, शरद जाधव, संजय कठाळे, अशोक भावे, अजय करोसिया, शंकर मेश्राम, रोहन चांदेकर, राजू चव्हाण, राहुल मेंढे, बंडू गायकवाड, शुभम पाटील, अजय गजभिये आदी पदाधिकारी उपस्थित होते.