Advertisement
नागपूर, ता. १७ : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोमवारी १७ मार्च रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. मुंबई येथे भारतीय जनता पक्षाच्या विभागीय कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.
याप्रसंगी विदर्भ विभागीय संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, माजी खासदार रामदास तडस, माजी आमदार गिरीश व्यास, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. संजय भेंडे, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम, प्रा. श्रीकांत देशपांडे, प्रदेश सह कार्यालयमंत्री संजय फांजे आदी उपस्थित होते.