Advertisement
मुंबई: महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव महेश झगडे, उपसचिव छाया वडते, शिवा संघटनेचे पदाधिकारी यांनीही महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.