Advertisement
नागपूर : रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक सरचिटणीस तथा राज्यसभेचे माजी उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या ९६ व्या जयंतीदिनी इंदोरा चौक येथील बॅरि.खोब्रागडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला उपमहापौर मनीषा धावडे, बसपा गटनेते जितेंद्र घोडेस्वार, नगरसेविका मंगला लांजेवार यांनी पुष्पहार अर्पण करुन महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन केले.
यावेळी माजी नगरसेवक प्रल्हाद दुर्गे, नरेश महाजन, मिलींद गोंडाणे, अजय वासनिक, अरविंद गोडघाटे, शिशुपाल कोल्हटकर, रमेश ढवळे, लहाणू बन्सोड यांच्यासह समता सैनिक दलाचे कार्येकर्ते उपस्थित होते.