नागपूर : चर्मकार समाजाचे दैवत संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिका मुख्यालयाच्या दालनातील संत रविदास महाराज यांच्या तैलचित्राला महापौर नंदा जिचकार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, अपर आयुक्त राम जोशी, अपर आयुक्त अझीझ शेख, चर्मकार संघटनेचे भैय्यासाहेब बिघाने, अशोक थोटे, पंजाबराव सेनीकर, कैलाश चंदनकर, महादेवराव मालखेडे, अजय बोरकर, भाऊराव तांडेकर, दादाराव दांडेकर, रमेश सारवे, शिवलाल गद्रे, श्रीमती अर्चना गिरडे, सुमन राजुसकर व चर्मकार समाजाचे बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.