नागपूर : 21 व्या शतकाचे आवाहन स्विकारून भारताला एक प्रगत राष्ट्र म्हणून पुढे आणण्यासाठी दूरसंचार तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ज्यांचे कार्यकाळात भरीव कामगिरी करण्यात आली असे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीव गांधी यांचा स्मृतीदिन देशभर “दहशतवाद व हिंसांचार विरोधी दिवस” म्हणून पाळण्यात येतो.
म.न.पा. केन्द्रीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राजीवजींच्या तैलचित्राला मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिसांचार विरोधी प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, सहा. आयुक्त श्री. महेश धामेचा, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, डॉ. गोवर्धन नवखरे, डॉ. विजय जोशी, उपायुक्त श्री. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणे, श्रीमती येलचटवार, निगम अधिक्षक श्री. श्याम कापसे, सहा. अधिक्षक श्री. राजकुमार मेश्राम आणि मोठया संख्येनी कर्मचारी उपस्थित होते.
माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त जनसंपर्क अधिकारी श्री. मनिष सोनी यांनी आज सकाळी अजनी चौक स्थित स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.