Advertisement
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने अज्ञानतेचा अंधार नाकारुन ज्ञान प्रकाशाला जीवनाचे ध्येय बनविणा-या विद्येच्या क्रांतीज्योती आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त मनपा केन्द्रीय कार्यालयात स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त श्री. अजय गुल्हाने यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी अति.आयुक्त राम जोशी, उपायुक्त रविंद्र भेलावे, तंत्रज्ञान संचालक महेश धामेचा, कार्यकारी अभियंता सुनिल उईके, सहा.जनसंपर्क अधिकारी अमोल तपासे, अनिल चव्हाण, जितेश धकाते, विनय बगले, कर्मचारी उपस्थित होते.
तसेच मनपा तर्फे सुभाष रोड उद्यान तसेच महात्मा फुले मार्केट स्थित सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.