नागपूर : महान स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला मनपा मुख्यालयात आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी उपायुक्त श्री. निर्भय जैन, रविंद्र भेलावे, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेन्द्र उचके, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, शिक्षणाधिकारी श्री. राजेंद्र पुसेकर, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी उपस्थित होते.
याशिवाय मानस चौक व सतरंजीपूरा येथील नेताजींच्या पुतळयाला मनपातर्फे सहा.जनसंपर्क अधिकारी अमोल तपासे यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी अग्निशमन विभागाचे जवानांनी नेताजींच्या पुतळयास मानवंदना दिली.