Advertisement
नागपूर: थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे व सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांनी महात्मा फुले यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी अति.आयुक्त संजय निपाणे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, सहा.जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, राजेश वासनिक आदी उपस्थित होते.