Advertisement
नागपूर : भारतीय संविधान दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे शनिवारी (ता.26) संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
मनपा मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक, सहायक आयुक्त श्री. महेश धामेचा, उपायुक्त श्री. अशोक पाटील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांच्यासह अग्निशमन विभागाचे अधिकारी श्री. दुबे, रोहिदास राठोड, जांभूळकर, अग्निशमन दलाचे जवान व कर्मचारी उपस्थित होते.