Advertisement
नागपूर : माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त बुधवारी (ता.१२) नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले.
मनपा मुख्यालयातील यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला मनपा अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त श्री. श्याम कापसे, अधीक्षक श्री. राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, श्री. प्रमोद हिवसे, श्री. सुधीर कोठे, श्री. अमोल तपासे, श्री. राजेश लोहितकर, श्री. मुकेश मोरे, सौ. किर्ती खापेकर, सौ. रेवती गभणे, श्री. विनोद डोंगरे, श्री. शैलेश जांभुळकर यांच्यासह इतर उपस्थित होते. मनपाच्या वतीने अजनी चौक येथील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळयावर माल्यार्पण करण्यात आले.