नागपूर: जनमाणसाच्या मनात ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात संघर्षाचे स्फुल्लिंग चेतविणारे, जूलूमी व लोकहिताच्या आड येणाऱ्या प्रत्येक शक्तीचा सामना करणारे, लोकशिक्षणाची विलक्षण हातोटी असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फ़े त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.
ब्रीटीश राजवटीविरोधात प्रतिसरकार स्थापन करुन ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणा-या नाना पाटील यांच्या प्रतिमेस प्रादेशिक संचालक श्री सुहास रंगारी आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री दिलीप दोडके यांनी माल्यार्पण करीत अभिवादन केले.
महावितरणच्या काटोल मार्गावरील विद्युत भवन कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी अधीक्षक अभियंता सर्वश्री हरिष गजबे, राजेश नाईक, मंगेश वैद्य, प्रभारी महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री अतुल राऊत, उपमहाव्यवस्थापक (माहीती तंत्रज्ञान) श्री प्रमोद खुळे, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री मधुसुदन मराठे, सहाय्यक महाव्यवस्थापक (मान संसाधन) श्री प्रदीप सातपुते उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री सचिन लहाने, कार्यकारी अभियंता श्री समीर शेंद्रे यांच्यासह महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यांतील अभियंते, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.