नागपुर : स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने २१ मे रोजी देशभरात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन पाळण्यात येतो. या निमित्ताने नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डाॅ.नितीन राऊत, ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य यांनी या नागपुरातील राजीव गांधी चौक, अजनी, येथील स्व.राजीव गांधी यांचे प्रतिमेस माल्यार्पण करून दहशतवाद विरोध दिवसाची शपथ दिली.
याप्रसंगी माजी पालकमंत्री डॉ. सतीशबाबू चतुर्वेदी, विरोधी पक्षनेता मनपा तानाजी वनवे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, गिरीश पांडव,नगरसेवक किशोर जिचकार तसेच कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संजय दूधे इत्यादि प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमानंतर राजीव स्पोर्टस् फाऊंडेशन व्दारे आयोजकांनी जीवनज्योती ब्लड बॅकेत रक्तदान केले, सदर फाऊंडेशनचे रक्तदानाचे हे २८ वे वर्ष आहे.