देशात GST अर्थातच एक वस्तू एक कर ही नवी करप्रणाली लागू झाली. जीएसटीला देश स्वतंत्र झाल्यानंतरचा सर्वात मोठा करबदल म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. भारतीय राज्यघटनेच्या 122व्या कलमानुसार 1 जुलैच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात सर्व वस्तु, उत्पादनांवर ‘GST’ करप्रणाली लागू झाली आहे.
काय आहे GST?
जीएसटी ही एक करप्रणाली आहे. यापूर्वी देशात केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या विभागातून सर्वीस टॅक्स, सेल्स टॅक्स, व्हॅट, एक्साईज ड्यूटी यांसारखे अप्रत्यक्ष कर वसुल केले जात असत. मात्र, जीएसटीमुळे हे सर्व कर आणि विभाग हे एकाच कक्षेत आले असून, उत्पादनांवर कोणत्याही प्रकारचा अप्रत्यक्ष कर लागणार नाही. सर्व वस्तू, उत्पादनांवर एकच कर लागू केला जाणार आहे. जीएसटीसाठी एकूण चार प्रकारचे स्लॅब (दर) करण्यात आले आहेत. 5, 12, 18 आणि 28 अशा प्रकारचे हे दर असणार आहेत. तसेच, याशीवय काही अतिरिक्त वस्तु, उत्पादनांवर सेस लावण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, पेट्रोल, डिझेल आणि मद्य या उत्पादनांना जीएसटीतून वगळण्यात आले आहे. आम्ही india.comच्या वाचकांसाठी एक यादी देत आहोत. ज्यात तुम्हाला समजू शकेल की, जीएसटीमुळे काय स्वस्त झाले काय महाग झाले.
सेवांवर लावण्यात आलेला GST रेट
0% GST Rate Services: (GSTमधून वगळण्यात आलेली उत्पादने) नॉन एसी ट्रेन, मेट्रो, बस, ऑटो, रिक्षा, आरोग्य, धार्मिक आमिक आणि चॅरिटेबल सेवा, टोल, वीज, निवासी घरभाडे, पीएफआरडीए, ईपीएफओ आणि ईएसआईसी यांसारख्या सेवा, म्यूजियम, नॅशनल पार्क मध्ये प्रवेश, जनधन आणि अटल पेंशन यांसारख्या सरकारी योजना, 1,000 रूपयांपर्यंत भाडे असलेलेली हॉटेल्स, दूध, मीठ, आटा, डाळ, तांदूळ यांसाख्या वस्तूची वाहतूक. (हेही वाचा, आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक नाही केलं?, काळजी करु नका ही आहे तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी)
5% GST Rate Services: (5% GST कर) – ट्रेन किंवा ट्रकमधून मालवाहतूक, एसी ट्रेनचे तिकीट, कॅब सेवा, विमानप्रवासात इकॉनॉमी क्लासचे तिकीट, टूर ऑपरेटर सर्विसेज, विमान लीजिंग, प्रिंट मीडियामध्ये जाहिरात.
12% GST Rate Services: (12 टक्के GST कर) – रेल्वे कंटेनरमधून सामान वाहतुक, विमाना प्रवासातील बिजनेस क्लासचे तिकीट, नॉन एसी रेस्टॉरंटमधील जेवन, दैनंदिन 1000 ते 2500 रूपये भाडे असलेली हॉटेल्स, कॉम्प्लेक्स किंवा बिल्डींग किंवा कंस्ट्रक्शन, पेमेंट अधिकार,
12% GST Rate Services: रेलवे कंटेनर से सामान ढुलाई, विमान का बिजनेस क्लास का टिकट, नॉन-एसी रेस्तरां में खाना, रोजाना 1000-2500 रुपए किराये वाला होटल, कॉम्प्लेक्स या बिल्डिंग का कंस्ट्रक्शन, पेटेंट अधिकार, तत्पूरत्या स्वरूपात मनी ट्रान्स्फर.
18% GST Rate Services: (18% GST कर) – फोन बिल, बॅंकिंग, वीमा आणि अन्य फायनान्शिअल सर्व्हिस, एसी तसेच, मद्यपरवाना असलेली रेस्टॉरंट, आउटडोअर कॅटरींगमधून खाद्यपदार्थांचा पूरवठा, दैनंदिन 2500 ते 5000 रूपये भाडे असलेली सर्व हॉटेल्स, सर्कस, क्लासिकल आणि फोक डान्स, चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे तसेच 250 रूपयांहून अदिक तिकीट दर असलेले मनोरंजनाचे प्रयोग, कामाचे ठेके आदी.
28 GST Rate Services: (28 GST कर) – सीनेमा तिकीट, थीम पार्क, मेरी-गो राऊंड, गोकार्टिंग, कॅसिने, रेसकोर्स, बॅले, आईपीएल यांसारखे स्पोर्ट इव्हेंट, फईव्ह स्टार किंवा त्याहून अदिक रेटिंगवाले हॉटेल्स- रेस्टॉरंट्स, दैनंदिन 5,000रूपयांहून अधिक भाडे असलेले हॉटेल्स आदी.
वस्तूंवर GST रेट
0% GST Rates Items : (0 टक्के GST असलेली उत्पादने) – गहू, तांदूळ, इतर धान्ये, मैदा, बेसन,चुरमुरे, ऊसाचा पाला, ब्रेड, साखर, गूळ, दूध, दही, ताक, चीज, अंडी, मांस, मासे, मध, ताजी फळे आणि भाज्या, प्रसाद, मीठ, खडक / काळे मीठ, केशर, टिकल्या, कुंकू, बांगड्या, विड्याचे पान, संततिनियमन औषधे, स्टॅम्प पेपर, न्यायालयाचे पेपर्स, पोस्टकार्ड पोस्ट / लिफाफे, पुस्तके, पेन्सील, खडू, वर्तमानपत्रे, मासिके, नकाशे, आलेखपेपर, हातमाग, मातीची भांडी, शेती साधने, बियाणे, न वापरले सेंद्रीय खत, सर्व प्रकारची गर्भनिरोधके, रक्त, ऐकु येण्यासाठी वापरण्यात येणारे कानाचे मशीन.
5% GST Rates Items:
ब्रँडेड कडधान्यं, ब्रँडेड पिठ, ब्रँडेड मध, साखर, चहा, कॉफी, गोड, खाद्यतेल, स्किम्ड दूध पावडर, मुलांसाठीचे दूध अन्नपदार्थ, रस्क, पिज्जा ब्रेड, टोस्ट ब्रेड, पेस्ट्री मिक्स, प्रक्रिया केलीली फळे, पैकिंग वाला पनीर, ड्राई फिश, न्यूजप्रिंट, ब्रोशर, लीफलेट, राशन का केरोसिन, रसोई गैस, झाडू, क्रीम, मसाले, जूस, साबूदाना, जड़ी-बूटी, लौंग, दालचीनी, जायफल, जीवन रक्षक औषधे, स्टेंट, ब्लड वैक्सीन, हेपेटाइटिस डायग्नोसिस किट, ड्रग फॉर्मूलेशन, क्रच, व्हीलचेयर, ट्रायसाइकिल, लाइफबोट, हॅंडपंप आणि त्याचे पार्ट्स, सोलर वॉटर हीटर, रिन्यूएबल एनर्जी डिवाइस, विट, मातीपासून बनवलेल्या टाइल्स, साइकल-रिक्शाचे टायर, कोळसा, लिग्नाइट, कोक, कोल गॅस, या सर्वांवर आण कंसेंट्रेट, रेशनींगवर मिळणारे रॉकेल, स्वयंपाकासाच गॅस आदी.
12% GST Rates Items:
खारे पदार्थ, भुजिया, बटर ऑयल, घी, मोबाइल फोन, ड्राई फ्रूट, फ्रूट और वेजिटेबल जूस, सोया मिल्क जूस आणि दूग्धजन्य ड्रिंक्स, प्रक्रिया केलेले किंवा गोठवलेले मांस-मासे, अगरबत्ती, कैंडल, आयुर्वेदिक-यूनानी, Homeo औषधे आदी.