नागपुर: भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष अमितजी शहा यांचे मुख्य भाषण संपल्या नंतरही कार्यकत्याचे जथे येतच होते, नागपुर जिल्ह्यातील पदाधिकारी, बुथप्रमुख यांना घेऊन येणारी विशेष ट्रेन भुसावल वरुन सूरत मार्गे मुंबई ला नेण्यात आली यामुळे तब्बल 24 तासाचा प्रवास करून पदाधिकारी बुथप्रमुख कार्यकर्ते बिकेसी मैदानावर पोहचले. त्यांना अमित शहा यांच्या मार्गदर्शना पासून वंचित रहावे लागले.
ऊर्जामंत्री व नागपुर चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले यांना याबाबत माहिती होताच त्यांनी भाजपा नागपुर जिल्हा अध्यक्ष डॉ राजीव पोतदार यांना मोबाईल वर संपर्क करून बिकेसी मैदानातील स्टेज जवळ बोलावून घेतले.
डॉ पोतदार सोबत भाजप नागपुर जिल्ह्यातील पदाधिकारी,बुथप्रमुख, कार्यकर्ते होते आता पोहचल्याचे सांगून डॉ पोतदार यांनी ग़ैरसोय झाल्याचे सांगितले.
बावनकुले यांनी सर्वप्रथम जेवण झाले का याची माहिती घेतली व जेवण घेण्याचा आग्रह केला.
बाहेरुन येणाऱ्या कार्यकर्त्यांची जेवनाची व्यवस्था बांद्रा पश्चिम येथील कैनरा बैंक समोर फटाक मैदानात करण्यात आली होती. सुमारे 3 किमी चे अंतर बावनकुले यांनी भाजप पदाधिकारी बुथप्रमुख कार्यकर्ते यांच्यासह पैदल तोडले. येथे भोजन व प्रवास व्यवस्था भाजप प्रदेश सचिव संजय उपाध्याय यांच्याशी चर्चा करून प्रत्येक कार्यकर्त्यांची जेवनाची सोय केली.