नागपूर : शहरातील महाल परिसरात काल झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी विपिन इटणकर आणि पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांची उच्चस्तरीय बैठक सुरू झाली आहे. कालच्या घटनेमागील खरे कारण शोधण्यासाठी आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकारने कडक भूमिका स्वीकारली आहे.दंगलखोरांवर कठोर कारवाई केली जाईल.
आतापर्यंत या संदर्भात ५ एफआयआर दाखल करण्यात आले असून ५० लोकांना ताब्यात घेण्यात आले . पोलिस आता ट्रिगर पॉइंटचा तपास करत आहेत आणि या घटनेच्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी कॉल रेकॉर्ड स्कॅन केले जात आहेत.
भाजप नेते बबनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांच्या जीवाची पर्वा न करता, परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिस दोन्ही समुदायांमध्ये ढाल म्हणून उभे राहिले. सध्या काही परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.