Published On : Mon, Jul 8th, 2019

कामठी तालुक्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात

कामठी :-केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना समाजातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवून पक्षसंघटन अधिक बळकट करावे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कामठी, भाजप कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना समाजातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवून पक्षसंघटन अधिक बळकट करण्याचे आव्हान राज्याचे ऊर्जा, उत्पादन शुल्क व नागपूर जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी तालुक्यातील वडोदा येथे आयोजित सदस्यता नोंदणी अभियानाच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले

राज्याचे ऊर्जा उत्पादन शुल्क व नागपूर , वर्धा जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारतमातेच्या प्रति मा व श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून भाजप सदस्यता नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली यावेळी कामठी मौदा विधानसभा क्षेत्राचे विस्तारक नरेश मोटघरे ,मनोज चौरे, कामठी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष आणि निदान कामठी तालुका भाजपा अध्यक्ष रमेश चिकटे ,तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष रामकृष्ण वंजारी ,सभापती अनिता चिकते, उपसभापती देवेंद्र गवते ,जिल्हा परिषद सदस्य विनोद पाटील ,नाना आखरे बडोद्याच्या सरपंच वनिता इंगोले ,उपसरपंच विशाल चा मठ ,संजय खराबे ,अरुण पोटभरे एडवोकेट अशिष वंजारी ,मोहन माकडे ,पंकज साबळे उपस्थित होते .

Gold Rate
Tuesday 18 Feb. 2025
Gold 24 KT 85,800 /-
Gold 22 KT 79,800 /-
Silver / Kg 96,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भाजप सदस्य नोंदणी अभियानात याप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असून माझ्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध सामाजिक योजनांची माहिती समाजातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवून पक्षसंघटन अधिक बळकट करण्याचे आव्हान केले अनेक मान्यवरांनी पक्षसंघटना बद्दल मार्गदर्शन केले

कार्यक्रम दरम्यान राज्याचे ऊर्जा ,उत्पादन शुल्क व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांची वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी त्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला कार्यक्रमाचे संचालन उपसरपंच विशाल चामट यांनी केले व आभार प्रदर्शन तालुका भाजपा अध्यक्ष रमेश चिकटे यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी

Advertisement