Published On : Wed, Jan 5th, 2022
By Nagpur Today Nagpur News

पालकमंत्र्यांची एम्स, मेडिकल व मेयोला भेट व पाहणी

Advertisement

ओमिक्रॉनपासून बचावासाठी वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर : ओमिक्रॉन संक्रमितांची वाढती रुग्णसंख्या व कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी ऑक्सिजन खाटा, आयसीयू कक्ष, बालकांसाठी स्वतंत्र वार्ड, ऑक्सिजनची उपलब्धता तसेच अनुषंगिक सर्व वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवाव्यात, असे निर्देश राज्याचे उर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जिल्हा प्रशासनाला व आरोग्य यंत्रणेला आज दिले.

Gold Rate
24 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पालकमंत्र्यांनी आज अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयास भेट देऊन कोविड वार्ड, खाटांची संख्या, ऑक्सिजन प्लाँट, मनुष्यबळ आदी बाबींची पाहणी केली. जिल्हाधिकारी आर. विमला, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., एम्सच्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पातूरकर, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, मेयोच्या अधिष्ठाता डॉ. भावना सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.

पाहणी दौऱ्यात प्रारंभी पालकमंत्र्यांनी एम्स येथील कोविड वार्ड, ऑक्सिजन खाटांची संख्या, कोविड चाचणी प्रयोगशाळेची पाहणी केली. ओमिक्रॉनचे वाढते संक्रमन व कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता एम्स प्रशासनाने डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करावी. सध्या याठिकाणी डॉक्टरांच्या एकूण 50 पदांपैकी 43 पदे भरलेली आहेत तर 7 पदे रिक्त आहेत. ओमिक्रॉन बाधितांसाठी व संशयित कोविड बाधितांसाठी 100 खाटांचे स्वतंत्र कोविड वार्ड उभारण्यात आले असून 40 आयसीयू खाटा, 25 व्हेंटिलेटर, चाचणी प्रयोगशाळा आदी सुविधा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

कोविड बाधितांसाठी 160 खाटांचे वार्ड सध्या कार्यरत असून 340 ऑक्सिजनयुक्त खाटांचे स्वतंत्र वार्ड चवथ्या माळ्यावर तयार करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वैद्यकीय, नर्सिंग कर्मचारी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. नॉन कोविड रुग्णांसाठीही एम्समध्ये स्वतंत्र सुविधा करण्यात आली आहे. एम्समध्ये 400 सिलेंडची क्षमता असेलेले चार पीएसए प्लाँट निर्माण होत असून याव्दारे 30 किलोग्रॅमचे 458 जम्बो सिलेंडर ऑक्सिजनची उपलब्धता होईल, अशी माहिती डॉ. दत्ता यांनी दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी मेडीकल कॉलेज येथे पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने उपाययोजनांचा आढावा घेतला. तेथील कोविड वार्डातील खाटांची स्थिती, संख्या, ऑक्सिजनयुक्त खाटा, आयसीयू आदीची त्यांनी पाहणी केली. यावेळी शासकीय मेडीकल कॉलेजच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मेडीकल कॉलेज व मेयो येथील ऑक्सिजन प्लाँटची पाहणी करुन ऑक्सिजनची उपलब्धता व क्षमता यासंदर्भात त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.

Advertisement
Advertisement