कामठी: नागपूर टुडे ने 29 मे च्या अंकात ‘कामठी शहर हागणदारीमुक्तीत पास मात्र उघड्यावरील शौच अजूनही सुरूच!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते या वृत्ताची गंभीर दखल घेत कामठी नगर परिषद प्रशासनाने कंबर कसली असून प्रभाग क्र 12 मध्ये आज 30 मे सकाळी 6 वाजेपासून गुडमॉर्निंग पथकाचा पहारा ठेवीत उघड्यावर शौचविधिस जाणाऱ्याचा शोध घेण्यात आला.मात्र उघड्यावर शौचविधी करणाऱ्या नागरिकांना गुडमॉर्निंग पथकाची चाहूल लागल्याने या गुडमॉर्निंग पथकाला उलटपायी परतावे लागले.
नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी-मौदा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या मौदा नगर पंचायत ला देश पातळीवर झालेल्या स्पर्धेत स्वच्छता सर्वेक्षण 2019 चा पुरस्कार मिळाला आहे तर त्याच विधानसभा क्षेत्रातील समावेश असलेले व नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे तालुकादर्जाप्राप्त कामठी ‘ब ‘ वर्ग नगरपरिषद च्या वतीने राबविण्यात आलेल्या हागणदारी मुक्त अभियानात कामठी शहर हागणदारी मुक्त झाल्याचे शासनदरबारी घोषित झाले असले तरी शहरातील कित्येक भागासह प्रभाग क्र 12 अंतर्गत येणाऱ्या सराय झोपडपट्टी तसेच बाबा अब्दुल्लाह शाह झोपडपट्टीत लाभार्थ्यांचे वर्ष लोटून अर्धवट शौचालय असल्याने या भागात उघड्यावर शौचास बसण्याची प्रथा अजूनही सुरू आहे.यानुसार कामठी-मौदा विधानसभा क्षेत्रातील मौदा नगरपंचायत चा देशपातळीवर चा पुरस्कार प्राप्त होतो मात्र कामठी शहराची हागणदारी मुक्ती ची ही स्थिती ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल… तसेच केंद्र शासनाच्या वतीने 2 ऑक्टोबर 2014 ला महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्याने स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यामध्ये गाव स्वच्छ तर नागरिक स्वस्थ या संकल्पनेनुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू करण्यात आले त्यानुसार कामठी नगरपालिकेच्या वतीने तत्कालीन मुख्याधिकारी विपिन मुद्दा यांच्या कार्यकाळात मे 2015 ला वयक्तिक शौचालयाचा गाजावाजा करीत कामठी शहरात अभियान राबविण्यात आले या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत सार्वजनिक शौचालय दुरुस्ती व शौचालय बांधकामाचे लोकार्पण करण्यात आले शिवाय गुडमॉर्निंग पथकादवारे उघड्यावर शौच करणाऱ्या व्यक्तीवर दण्ड वसुली करीत प्रतिबंध सुद्धा घालण्यात आला यानुसार कित्येकांनी उघड्यावर शौचविधी करणे टाळत वयक्तिक शौचालय बांधकाम ला पुढाकार दाखवीत प्रयत्न साधले मात्र प्रभाग क्र 12 मध्ये या वयक्तिक शौचालय लाभार्थ्यांची पाहनी केले असता हागणदारी मुक्त अभियानाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येतो.वास्तविकता प्रभाग क्र 12 अंतर्गत येणाऱ्या कामठी बस स्टँड च्या बाजुला असलेल्या सराय झोपडपट्टी मध्ये लाभार्थ्यांनी वयक्तिक शौचालय बांधकाम च्या लाभाचा अर्ज केला असता यांचा अर्जाला मान्य करीत शौचालय बांधकामास सुरुवात करण्यात आले मात्र या परिसरात बोटावर मोजणाऱ्या ठिकाणी शौचालय बांधकाम झाले असून कित्येक ठिकाणी अर्धवट बांधकाम झाले आहे आज वर्ष लोटूनही या अर्धवट बांधकामाला पूर्णत्वास करण्यात आले नाही हीच स्थिती बाबा अब्दुल्लाह शाह दर्गा परिसरातील सुद्धा आहे नाईलाजाने येथील दिव्यांग तसेच लहान लेकरे हे उघड्यावर शौचविधी करीत आहेत. यासंदर्भात नागपूर टुडे ला प्रकाशित झालेल्या बातमी वरून मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी स्वास्थ्य निरीक्षक गफ्फु मेथीयां यांना प्रभाग क्र 12 मध्ये गुडमॉर्निंग पथक नेमून उघड्यावर शौचविधी करणाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्याचे दिलेल्या आदेशावरून आज 30 मे ला सकाळी 6 वाजता स्वास्थ्य निरीक्षक विजय मेथीयां यांनी गुडमॉर्निंग पथकातील 12 कर्मचाऱ्यासह प्रभाग क्र 12 येथील बाबा अब्दुल्लाहशाह दर्गा तसेच सराय झोपडपट्टी येथे गुडमॉर्निंग पथक राबवून पहारा ठेवला .तसेच हे गुडमॉर्निंग पथक जवळपास 12 दिवस राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.
– संदीप कांबळे कामठी