दवलामेटी: महीलांना आपले बाळ सुद्रुढ व निरोगी राहण्यासाठी अंगणवाडी मधुन पुरवठा होत असलेला पोषक आहार, त्याचा योग्य तो उपयोग करावा व बालकांचा सर्वांगीण विकास हा अंगणवाडी मधूनच साध्य होतो त्यासाठी आपल गांव आपली अंगणवाडी ला प्रतिसाद द्यावा असे प्रतिपादन आपल्या अध्यक्ष भाषणातून मा उज्ज्वला बोढारे म्याडम सभापती महीला व बाल कल्याण यांनी प्रतिपादन केलें. तसेच भारती ताई पाटील शिक्षण क्रिडा व अर्थ सभापती नागपुर, रेखा ताई वरठी सभापती पं सं नागपुर ग्रामीण, रिताताई उमरेडकर सरपंच दवलामेटी ग्रांपं,मा प्रशांत केवटे उपसरपंच दवलामेटी ग्रांपं, रक्षा सुखदेवे ग्रां पं सदस्य, अर्चना चौधरी सदस्य ग्रां पं, शेंद्रे ताई ग्रां पं सं दवलामेटी यांच्या प्रमुख उपस्थितीत पोषण अभियान कार्यक्रम दवलामेटी ग्रामपंचायत चा सभा गृहात अंगणवाडी तर्फे घेन्यात आला.
सर्वप्रथम राष्ट्र माता जिजाऊ व मातोश्री सावित्रीबाई फुले यांच्या फोटो चे पुजन व दिपप्रज्वलन पाहुण्यांच्याहस्ते करण्यात आले व नंतर आहार प्रात्यक्षिक प्रर्दशन चे पाहणी करुण प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक निश्चित करण्यात आले.
तसेच भारती ताई पाटील शिक्षण क्रिडा व अर्थ सभापती यांनी महीलांना मार्गदर्शन करतांना सांगीतले की आपल्या परिवाराची काळजी घेतांना स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावेत, स्वतःचीसुध्दा काळजी घ्यावी जीवण हे फार अमुल्य आहे अंगणवाडी ला प्रतिसाद द्यावा व योग्य विकास होण्याच्या द्रुष्टीने योजनेबाबत माहीती करून घ्यावी पोषण आहार कडे विशेष लक्ष देऊन आपल्या कुटूंबाच्या आरोग्यकडे लक्ष द्यावे असे सांगीतले तसेच रिताई उमरेडकर सरपंच दवलामेटी यांनी पोषक आहार प्रात्यक्षिक मधुन कोणते पोषक तत्व मिळतात व गरोदर पणापासुन ते बाळ 6 वर्षापर्यंत अंगणवाडी मधुन काळजी घेतात मातेने आपली विशेष काळजीघ घ्यावी जनेकरुन आपले बाळ कुपोषित जन्माला येणार नाही आणि नंतरही त्याच्यावाढीकडे व परिसर स्वच्छता कडे लक्ष द्यावेत असे सविस्तर मार्गदर्शन केले. पोषक आहारात तीन क्रमांक निश्चित करून ग्रां पं तर्फे बक्षीस जाहीर करन्यात आले.
प्रास्ताविक मा उज्वला ढोके म्याडम यांनी तर संचालन उषा चारभे यांनी केले. आभार रेखा बिडवाईक यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करन्याकरिता नलु मेश्राम ताई, शोभा मानकर ताई,सुजाता सुर्यवंशी,मालती वाडेकर, रेखा ,मनिषा भोसले,अंजली राउत, वनिता चट्टे,रेखा नगराळे,अर्चणा बोंदरे,सविता गंवई,संगिता गडवाले , संघमित्रा शेंडे,नंदा गोलाईत,कल्पणा रामटेके ईत्यादि कार्यक्रमात गावातील महीला व ईतर सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिस उपस्थित होते.