नागपूर : शीख धर्माचे पहिले गुरु आणि संस्थापक गुरु नानक देव यांची जयंती कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. यावर्षी गुरु नानक यांची जयंती 27 नोव्हेंबरला साजरी करण्यात आली.
लोक हा पवित्र दिवस प्रकाश उत्सव आणि गुरु पर्व म्हणून साजरा करतात. शीख धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी हा दिवस खूप खास आहे. या दिवशी गुरुद्वारांमध्ये कीर्तन केले जाते आणि गुरुवाणीचे पठण केले जाते. तसेच ठिकठिकाणी लंगरचे आयोजन केले जाते.
नागपुरातही शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांची 554 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यादरम्यान शीख बांधवांनी वाहेगुरु नामाचा जप करत प्रभातफेरी काढली. यानिमित्ताने गुरुद्वारामध्ये भजन , कीर्तनाच्या कार्यक्रम आयोजित केला होता.