अरुण जोशी शिक्षण महाविद्यालय हनुमान नगर नागपूर येथे आज दिनांक १३/०७/२०२२ रोजी गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम संस्थेच्या विश्वस्त सौ महालक्षमी जोशी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमात प्रा. सौ. मेधा मोहरली गुरूंचे महत्व सांगतांना म्हणाल्या कितीही नवीन टेकनॉलॉजि शिक्षणात वापरली तरीही गुरुचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सौ. भावना इंगळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सौ. अर्चना दुरूगकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सौ. मीना घोष यांनी केले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.