Advertisement
नागपूर : शहरात अवैधरित्या गुटखा-तंबाखू तस्करी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शेख फैजान शेख अमान (वय 24 वर्ष रा.आय बी एम रोड गिट्टीखदान पोलीस ठाणे गिट्टीखदान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गिट्टीखदान पोलीस स्टेशनअंतर्गत गुन्हे शाखा युनिट 2 च्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी आरोपींकडून शासनाने प्रतिबंधित केलेले वेगवेगळ्या कंपनीचे गुटखा आणि तंबाखूसह एकूण1 लाख 77 हजार 567 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 328,272,273,188 भादवी कायदा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.