Published On : Sat, May 4th, 2019

अखेर झाडे घेऊ लागली मोकळा श्वास

Advertisement

आयुक्तांच्या आदेशानंतर डी-चोकींगला वेग

नागपूर: सिमेंट रस्त्यांच्या मार्गात असलेल्या झाडांच्या बुंध्याभोवती मोकळी जागा न सोडल्याने शहरातील अनेक झाडांचे अस्तित्व धोक्यात आले होते. यासंदर्भात मनपा आयुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर संपूर्ण शहरात डी-चोकींगच्या कामाने वेग घेतला असून अनेक झाडांच्या बुंध्याभोवतीची जागा मोकळी करण्यात आली आहे. त्यामुळे झाडे आता मोकळा श्वास घेऊ लागले आहेत.

Gold Rate
21 April 2025
Gold 24 KT 96700 /-
Gold 22 KT 89,900 /-
Silver / Kg - 96,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सिमेंट रस्ता बांधताना रस्त्यालगत असलेल्या बहुतांश झाडांभोवती कंत्राटदाराने सिमेंटचे आवरण केले होते. यामुळे झाडांना पाणी टाकता येत नव्हते. पाणी मिळत नसल्याने झाडांचे अस्तित्वच धोक्यात आले होते. अनेक झाडे मरणासन्न अवस्थेत यायला लागली होती. यासंदर्भात शहरात पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारी संस्था ग्रीन व्हिजील फाऊंडेशनने संस्थेचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. नागपुरातील झाडांमुळे ‘ग्रीन सिटी’ म्हणून शहराची ओळख आहे. मात्र, कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे ही ओळख मिटण्याची चिन्हे दिसत होती. सिमेंटने झाडांची बुंधे बांधल्या गेल्याने जमिनीखालील मुळांवर त्याचा परिणाम जाणवू लागला होता. ही गंभीर बाब लक्षात येताच मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व झोन आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली आणि गांभीर्य लक्षात आणून दिले. २३ मे पर्यंत ही सर्व झाडे मोकळी करण्यात यावी, झाडांच्या बुंध्यांच्या बाजूला ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांचे तांत्रिक सहकार्य घेऊन जागा मोकळी करण्याचे आदेश देण्यात आलेत. आदेशाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी आणि प्रत्येक सोमवारी त्यासंदर्भातील अहवाल मांडण्यात यावा, असेही आयुक्तांनी निर्देशित केले होते.

त्यानुसार संपूर्ण शहरातील सिमेंट रस्त्यांनी वेढलेल्या झाडांना मोकळे करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. संपूर्ण झोनमधील सहायक आयुक्तांनीही हा विषय गांभीर्याने घेत तातडीने कार्याला सुरुवात केली आहे. प्रत्येक झाडांच्या बुंध्याभोवतीचे सिमेंट आवरण काढून झाडांचा बुंधा मोकळा करण्यात येत आहे व त्याला आकर्षक स्वरूपही देण्यात येत आहे. यासंदर्भात ग्रीन व्हिजील फाऊंडेशनने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होत आहे.

Advertisement
Advertisement