Advertisement
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे सत्ता संघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल देण्यास सुरुवात केली आहे. यावेळी न्यायालयाने महत्वाचे निरक्षण नोंदवले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता, तर सरकार परत आणता आले असते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निमित्ताने नबाम रेबिया प्रकरणाचा विषय सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे देण्याचा निर्णय खंडपीठाने घेतला आहे. सरन्यायाधीस धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश एम. आर शाह, न्यायाधीश कृष्ण मुरारी, न्यायाधीश, हिमा कोहली, न्यायाधीश पी.एस नरसिम्हा यांच्या घटनापीठाने हा निर्णय घेतला आहे.