गांधीनगर शारदा महिला मंडळ आणि भाजपा महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने चैत्र गौरी हळदी-कुंकू कार्यक्रम आणि महिलांसाठी विविध स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका परिणीता ताई फुके, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रगती ताई पाटिल, तसेच “मी आणि माझी गुढी” या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून पल्लवी मुलमुले उपस्थित होत्या.
“मी आणि माझी गुढी” या स्पर्धेत विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे:
प्रथम क्रमांक – रीना रेवतकर
द्वितीय क्रमांक – अखिला अष्टपुत्रे
तृतीय क्रमांक – मनिषा संतोषवार
उत्तेजनार्थ – पुष्पा शिवणकर, मंजुषा तातावार, संध्या दारव्हेकर
लकी ड्रॉ स्पर्धेत – संगीता लद्खैडकर, राधा चोपडे विजयी ठरल्या.
सुंदर गौराई स्पर्धा – करिश्मा पांडे, राधा चोपडे यांनी बाजी मारली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा गीता काळे यांनी केले.
संचालन मंजुषा तातावार यांनी तर आभार प्रदर्शन पुष्पा शिवणकर यांनी केले.
या कार्यक्रमात विणा वडेट्टीवार, वांसती साहु, श्रावी संतोषवार, प्रांजली मते, स्मिता केदार, मनिषा संतोषवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.