नागपूर : मकर संक्रांतीच्या पर्वावर मानिनी सखी मंच आणि सरदार पटेल शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिला भगिनींकरिता हळदी कुंकू तसेच महिला स्वयं रोजगार व प्रशिक्षणाचा समारोप व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम मनपा मैदान शाहू नगर, बेसा रोड येथे दिनांक १९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात तब्बल २ हजार महिलांनी सहभाग घेतला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वैशालीताई सुधाकरजी कोहळे, अध्यक्ष-दीपस्तंभ फाउंडेशन, मा. सुनीलजी मानेकर, अध्यक्ष-सरदार पटेल शिक्षण संस्था, मा सौ. अर्पणा सुनील मानेकर, अध्यक्षा-माननीय सखी मंच, रिटायर्ड एसीपी अर्जुनराव मुदगल सर, कपिल ढोबळे, सोहेल जी खान, मामा राऊत, टिळक नाईक, अर्चनाताई बारई, सुनिता ताई चांदपूरकर, रंजनाताई गेडाम, मनीषाताई मोजणकर, दिव्या जिल्हारे, शुभांगीताई घ्यार, सारिका ताई ठाकरे, मा. श्री. विष्णुभाऊ आसोले, मा. श्री. संजुभाऊ ठाकरे, सौ. ज्योतीताई देवघरे, सौ. साविताताई मोहनजी मते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मान्यवर पाहुण्यांनी महिलांच्या प्रेरणादायी कार्याची प्रशंसा केली व त्यांच्या भविष्याच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते लकी ड्रॉ मध्ये विजेत्या ठरलेल्या ३० महिलांना बक्षीस वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व महिला भगिनींना मोफत उपहार देण्यात आले.
महिलांना सक्षम करणारा उपक्रम
मानिनी सखी मंच तर्फे आयोजित स्वयं रोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे महिलांना व्यवसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येते. ज्यामध्ये ड्रेस डिझायनिंग, मेंदी डिझाइन, ब्यूटी पार्लर, आणि हँडिक्राफ्ट यांचा समावेश आहे. या प्रशिक्षणातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळते. या उपक्रमाचे श्रेय श्री. सुनील मानकर आणि सौ. अर्पणा मानकर यांना जाते.
या कार्यक्रमात लकी ड्रॉ द्वारे ३० विजेत्यांना अनेक आकर्षक बक्षिसे वितरित करण्यात आली. या बक्षिसांमध्ये मिक्सर ग्राइंडर, सोन्याची नथ, साडी सेट, वॉशिंग मशीन, आणि इतर वस्तूंचा समावेश होता. महिलांच्या चेहऱ्यावर या बक्षिसांमुळे आनंद ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमात महिलांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक करत अशा प्रकारच्या उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचे उपस्थितांनी अधोरेखित केली. मानिनी सखी मंचच्या पुढाकारामुळे महिलांना स्वावलंबनाचे बळ मिळत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेमुळे उपस्थित महिला आणि मान्यवरांनी संयोजकांचे अभिनंदन केले व भविष्यात देखील अशाच उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.