Published On : Tue, Jan 30th, 2024

नागपुरात गुरुवारी अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद !

Advertisement

नागपूर: महापालिका व ओसीडब्ल्यूच्यावतीने अमृत-१ योजनेअंतर्गत पेंच-२ फिडरवर २४ तासांचे शटडाउन घेण्यात येणार असल्याने गुरुवार, १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपासून ते शुक्रवार २ फेब्रुवारी सकाळी १० वाजेपर्यंत लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, मंगळवारी या झोनमधील अनेक वस्त्यांचा पाणीपुरवठा बाधित होणार आहे. यादरम्यान टँकरनेही पाणीपुरवठा होणार नसल्याचे ओसीडब्ल्यूने कळवले आहे.

‘या’ परिसरातील जलपुरवठा होणार बाधित –
लक्ष्मीनगर झोनमधील बंडू सोनी लेआउट, पठाण लेआउट, तुकडोजीनगर, कामगार कॉलनी, आयटी पार्क, गायत्रीनगर, विद्याविहार, संपूर्ण गोपालनगर, विजयनगर, व्हीआरसी कॅम्पस, पडोळे लेआउट, गजानननगर, मणी लेआउट, एसबीआय कॉलनी, करीम लेआउट, उस्मान लेआउट, एनपीटीआय, परसोडी, खामला जुनी वस्ती, सिंधी कॉलनी, व्यंकटेशनगर, गणेश कॉलनी, मिलिंदनगर, प्रतापनगर, टेलिकॉमनगर, स्वावलंबीनगर, दीनदयालनगर, लोकसेवानगर, अग्ने लेआउट, पायोनीअर सोसायटी खामला, त्रिशरणनगर, पूनम विहार, स्वरूपनगर, हावरे लेआउट, अशोक कॉलनी, गेडाम लेआउट, एनआयटी लेआउट, भुजबळ लेआउट, प्रियदर्शिनीनगर, इंगळे लेआउट, साईनाथनगर, पावनभूमी, उज्ज्वलनगर, जयप्रकाशनगर, पंचदीपनगर, राजीवनगर, सीतानगर, राहुलनगर, सावित्रीनगर, तपोवन कॉम्पलेक्स, सोमलवाडा, कर्वेनगर, पांडे लेआउट, जुने आणि नवे स्नेहनगर, गावंडे लेआउट, सेंट्रल एक्साइज कॉलनी, मालवीयनगर, योगक्षेम लेआउट, लाहरी कृपा, गांगुली लेआऊट, अभिनव कॉलनी, पर्यावरणनगर, नरकेसरी लेआऊट, मेहेरबाबा कॉलनी, छत्रपतीनगर, भाग्योदय सोसायटी, नागभूमी लेआऊट, डॉक्टर कॉलनी, हिंगणा रोड, राजेंद्रनगर, कल्याणनगर, यशोदानगर, वासुदेवनगर, लुंबिनीनगर, गाडगेनगर, गुडलक सोसायटी, महादा कॉलनी, सुर्वेनगर, आदर्शनगर, सौदामिनी सोसायटी, प्रगतीनगर, शहाणे लेआउट, बागणी लेआउट, नगर लेआउट, सुभाषनगर, भेंडे लेआउट, सोनेगाव, लोकसेवानगर, इंदप्रस्थनगर, अमर आशा लेआउट, पन्नासे लेआउट, एचबी इस्टेट, ममता सोसायटी, स्वागत सोसायटी, परातेनगर, समर्थ नगरी, अध्यापक लेआउट, एलआयजी आणि अहिल्यानगर, हिरणवार लेआउट, प्रसादनगर, सहकारनगर, गजानन धाम, मनीष लेआउट, जलविहार कॉलनी, मंगलधाम सोसायटी, जलतरंग, नेल्को सोसायटी, एनआयटी, भाग्यश्री लेआउट, झाडे लेआउट, अष्टविनायकनगर, कॉसमॉसनगर, राष्ट्रीयनगर या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Advertisement