नागपूर : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’, अशी झाली आहे
एकनाथ शिंदेंचे निम्मे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत,असा दावा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.हे पाहता शिंदे गटाचे निम्मे आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावाही वडेट्टीवार यांनी केला.
शिवसेना शिंदे गट गोंधळलेला आहे.अजित पवार गटाचीही तीच स्थिती आहे.भाजपाची उमेदवारी निवडीसंदर्भात दमछाक झाली. त्यामुळे इंडिया आघाडी भाजपाचे महाराष्ट्र विजयाचे स्वप्न मातीत मिसळेल,असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.विदर्भात काँग्रेसला अनुकूल अशी परिस्थिती आहे. पहिल्या टप्प्यातील पाचही ठिकाणी जनता काँग्रेसला बहुमत देईल.
सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लोकांच्या मनात राग आणि चीड आहे. हुकूमशाही पद्धतीने सरकार काम करत असून लोकांच्या मनात यांच्याप्रति क्रोधाची भावना आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी काम करणार आहे.