नागपूर : मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार कारण्यात आला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. सर्व स्तरावरून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. नागपुरातील मुलींनीही या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त केला. ‘नागपूर टुडे’शी बोलतांना त्यांनी आपले मत मांडले.
त्या महिलांची नग्न धिंड काढणाऱ्या आरोपींना फाशी द्या नाहीतर त्यांना आमच्याकडे सुपूर्द करा, असे मत एका मुलीने व्यक्त केले. जर दुसरीने सरकारने या आरोपींना मोकाट सोडल्यास आम्ही शांत बसणार नाही, असे म्हटले. या घटनेवरून महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपींनी जे अमानुष कृत्य या महिलांसोबत केले तसेच त्यांच्यासोबतही करण्यात यावे,असे मतही काही मुलींनी व्यक्त केले.
दरम्यान मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ४ मे २०२३ रोजी मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात ही घटना घडली. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.