नागपूर : हंसापुरीत जय श्री राम बॅगल्स स्टोरमध्ये ३ युवकांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे.या गुंड युवकाच्या टोळीने जुन्या वादातून बांगड्यांचा दुकानावर तोडफोड करत चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात एका लहान मुलासह तीन जण जखमी झाले आहेत.तसेच आरोपींनी दुकान मालकाकडून ५० हजाराच्या जवळपास रक्कम लंपास केली आहे.
वेदांत, तिल्ली आणि गदू गौर असे या गुंड युवकांची नावे आहेत.
गेल्या १५ दिवसांपूर्वी गुंड युवकांसोबत बांगड्यांच्या दुकानाच्या मालकाचा वाद झाला होता. यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल करण्यात आली होती. यानंतर दोन्ही गटात सेटलमेंट झाले होतो.मात्र आरोपी युवकांकडून पैश्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. त्याच वादातून आरोपींनी आज दुकानाची तोडफोड कार दुकानदाराला मारहाण केली.
तसेच रोख रक्कम घेऊन पळ काढला.या घटनेसंदर्भात पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तापस सुरू केला आहे.