Published On : Thu, Apr 6th, 2023

हनुमान जन्मोत्सव: जामसावळी मध्ये लाखो भाविकांनी अंजनीसुताचे दर्शन केलेहनुमान जन्मोत्सव: जामसावळी मध्ये लाखो भाविकांनी अंजनीसुताचे दर्शन केले

Advertisement

जामसावळी येथील चमत्कारिक हनुमान मंदिरात गुरुवार ला हनुमान जन्मोत्सवानिमित्त मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि देशभरातील लाखो भाविकांनी हजेरी लावत दर्शन घेतले.मध्यरात्री दोन वाजतापासून हनुमानजींच्या श्रीमूर्तीला रुद्राभिषेक महापूजा, त्यानंतर महाआरती झाली. पहाटे पाच वाजतापासून भाविकांनी हनुमानजींच्या श्रीमूर्तीचे दर्शन घेतले. खासदार नकुलनाथ यांनी हेलिकॉप्टर मधून मंदिर परिसरात पुष्पवृष्टी करून हनुमानजींच्या मूर्तीचे दर्शन घेतले.

रुद्राभिषेक व महाआरतीला माजी मंत्री नानाभाऊ मोहोड, माजी मंत्री परिणय फुके,मंदिर समिति के अध्यक्ष धीरज चौधरी,कोषाध्यक्ष चंद्रशेखर दानी, सचिव टीकाराम कारोकार ,सदस्य प्रदीप बूटे ,झोनल रेल्वे सदस्य विजय ढवळे,भाजप नेता संजय राठी,आशीष ठाकरे आदींची उपस्थिती होती. मंदिराचे गर्भगृह फुलांनी सजविले होते. प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.

Advertisement

मंदिर प्रशासन व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने ठिकठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ग्रामीण आदिवासी समाज विकास संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मानसिक, आरोग्य जनजागृती अभियानांतर्गत भाविकांना माहिती दिली.

छिंदवाडा जिल्ह्याच्या सौंसर तहसील मुख्यालयापासून 7 किमी अंतरावर आणि पांढुर्णा रस्त्यावरील नागपूर छिंदवाडा राष्ट्रीय महामार्गावरील बजाज चौकापासून एक किमी अंतरावर जामसावळीचे हनुमान मंदिर श्रद्धेचे केंद्र आहे. पौराणिक कथेनुसार, हनुमानजींची श्रीमूर्ती पीपळाच्या झाडाखाली स्वयं प्रकट झाली आहे.पिंपळाच्या झाडाखाली बसलेली हनुमानजींची श्रीमूर्ती ऊर्ध्वमुखी आहे.अशी ऊर्ध्वमुखी श्रीमूर्ती संपूर्ण भारतात अन्य कोठेही नाही.