Advertisement
नागपूर: ज्येष्ठ नेते हरिभाऊ नाईक यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला दु:ख झाले. कामगारांच्या हक्कासाठी आयुष्य वेचणारा व्रस्तस्थ नेता आज आपल्यातून गेला, अशा शब्दात ना. गडकरी यांनी हरिभाऊ नाईक यांना श्रध्दांजली अर्पण केली.
हरिभाऊंना मी जवळून पाहिले आहे. राजकारणात राहून त्यांनी कायम समाजकारणावर जोर दिला. त्यांची ही शिकवण सर्वांसाठी आदर्श आहे.
कामगारांसाठी सतत संघर्ष करणारा नेता आपल्यातून गेला याचे मला अतीव दु:ख असल्याच्या भावनाही ना. गडकरी यांनी व्यक्त केल्या.