महापौरांनी केला सत्कार
नागपूर : निगम सचिव हरीश दुबे यांच्यासह २३ अधिकारी व कर्मचारी शनिवारी (ता.३०) नागपूर महानगरपालिकेच्या सेवेतून निवृत्त झाले. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते सेवानिवृत्त निगम सचिव हरीश दुबे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मु स्थापत्य व प्रकल्प समितीचे सभापती अभय गोटेकर, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार उपस्थित होते.
निगम सचिव हरीश दुबे यांच्यासह सेवानिवृत्त झालेल्या २३ अधिकारी व कर्मचा-यांचाही शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह प्रदान करुन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये विकासयंत्री विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एम.नेरळ, लोककर्म विभागाचे उपअभियंता बी.जी.निंबेकर, विकासयंत्री विभागाचे उपअभियंता मो.शफीक, आरोग्य विभागातील ई.सी.जी. टेक्निशियन मीना बडवार, आयुर्वेदिक कम्पाउंडर श्रीकांत गिरधर, अग्निशमन विभागातील अग्निक व्ही.एन.ठवकर, कारखाना विभागातील फिटर मिस्त्री आर.जी.तायडे, सहायक शिक्षक राहुल आगलावे, सहायक शिक्षिका सुनीता सायमन, सहायक शिक्षिका शाहीदा परवीन मो.अब्दुल अजीज, आरोग्य विभागातील चौकीदार प्रकाश पेंदाम, स्थानिक संस्था कर विभागातील चपराशी बळवंत चव्हाटे, शरद येसकर, फायलेरिया विभागातील क्षेत्र कर्मचारी सुदाम बांगडकर, लोककर्म विभागातील मजदुर क्रिष्णा बांते, शिक्षण विभागातील चपराशी गीता दासर, भोलानाथ श्रीनाथ, जलप्रदाय विभागातील चपराशी शिवराम कांबळे, आरोग्य विभागातील भगवान महाजन, प्रमिला बोयत, खुशाल मतेलकर, विवेका हजारे यांचा समावेश होता. यावेळी निगम अधीक्षक मदन सुभेदार, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी अनंत मडावी, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, सहायक निगम अधीक्षक मनोज कर्णीक, लेखा अधिकारी राजेश मेश्राम, सहायक अधीक्षक (पेन्शन) नितीन साकोरे, अग्निशमन विभागाचे सुनील राउत, केशव कोठे, दिलीप तांदळे, राष्ट्रीय मनपा कॉर्पोरेशन एम्पॉइज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, कोषाध्यक्ष प्रवीण तंत्रपाळे, रंजन नलोडे आदी उपस्थित होते.