Published On : Tue, Mar 15th, 2022
By Nagpur Today Nagpur News

कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत अवैद्य कोळसा चोरी टाल ला सुगीचे दिवस

Advertisement

– पाच अवैद्य कोळसा टालवर कार्यवाहीत १ ट्रक १० लाख व ३१ टन कोळसा १ लाख ५५ रू. असा ११ लाख ५५ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस काही अंतरावरील वेकोलि कामठी उपक्षेत्र व गोंडेगाव उप क्षेत्रा च्या खुली कोळसा खदान येथील कोळसा चोरी करणा-या परिसरातील पाच अवैद्य कोळसा टाल वर वेकोलि सुरक्षा रक्षक व कन्हान पोलीसानी पहिल्यांदा कार्यवाही करून एक बाराचाकी ट्रक किमत १० लाख रूपये सह ३१ टन वेकोलि खुली खदान चा चोरीचा दगडी कोळसा किंमत १ लाख ५५ हजार रूपये अशा एकुण ११ लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून वेकोलि सुरक्षा रक्षक व कन्हान पोलीसानी कार्यवाही करून अवैद्यरित्या कोळसा टाल चालविण्या १२ आरोपी विरूध्द कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपी चा शोध घेत आहे.

Advertisement
Wenesday Rate
Wednesday01 Jan. 2025
Gold 24 KT 76,900 /-
Gold 22 KT 71,500 /-
Silver / Kg 86,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोलि कामठी उपक्षेत्र व गोंडेगाव उपक्षेत्र च्या कामठी, इंदर व गोंडे गाव-घाटरोहणा खुली कोळसा खदान असुन या कोळ सा खाणीतुन दररोज मोठया प्रमाणात कोळसा चोरी होत असुन या परिसरात वेकोलि खुली कोळसा खदान सुरक्षा अधिकारी व कन्हान पोलीसाच्या मुक संमतीने परिसरात अवैद्य कोळसा टाल दिवसे दिवस वाढत असामाजिक तत्वाचा बोलबाला वाढुन खुली कोळसा खदान ते राष्ट्रीय चारपदरी महामार्गाने डुमरी स्टेशन रेल्वे कोळसा यार्ड तसेच गोंडेगाव ते अण्णामोड रस्त्या ने डुमरी स्टेशन ला ट्रक व्दारे कोळसाची वाहतुक होत असल्याने नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा लगत बिनधास्त अवैद्य कोळसा टाल सुरू झाल्याने दररोज या सहा टाल व्दारे आठ ते दहा ट्रक चोरीचा कोळसा बाहेर नागपुर, रामटेक कडे चांगल्या किंमतीने विकुन मालामाल होत असल्याने या अवैद्य कोळसा टाल चालविण्यांचा पेव फुटला आहे.

१) खदान नं. ६ व ७ परिसरातुन १८ टन चोरीचा ९० हजाराचा कोळसा पकडला.

शनिवार (दि.१२) मार्च २०२२ ला रात्री ९ ते ९ : ३० वाजता दरम्यान वेकोलि सुरक्षा रक्षक देवीप्रसा द बाबुलाल देविया वय ३३ वर्ष राह. खंदान नं.६ हे सहकर्मी सह कर्तव्यावर असुन पेट्रोलिंग करीत असतां ना त्यांना दिसुन आले कि,१) मिथुन मनी नडार व २) मनिषसिंग यांनी संगणमत करून वेकोलि (डब्लु सी एल) उपक्षेत्र कामठी खुली कोळसा खदान येथील चोरी केलेला १८ टन कोळसा चोरून खादान नं. ६ व ७ परिसरात अवैध कोळसा टाल वर साठवुन ठेवल्याचे मिळुन आल्याने देवीप्रसाद देविया यांनी कोळसा जप्त करून त्याचे वजन करून काटा पावती घेऊन १८ टन कोळसा प्रत्येकी ५ हजार रुपये टन प्रमाणे एकुण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करित कन्हान पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्याने कन्हान पोलीसांनी आरोपी १) मिथुन मनी नडार राह. मनसर ता. रामटेक व मनिष सिंग राह. कन्हान या दोन्ही आरोपी विरुद्ध कलम ३७९ , ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्ष क विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपी चा शोध घेत आहे.

२) डुमरी शिवारातुन चोरीचा २ टन कोळसा १० हजार रूपयाच पकडला.

शनिवार (दि.१२) मार्च २०२२ ला रात्री ११ ते ११:३० वाजता दरम्यान वेकोलि सुरक्षा रक्षक राकेश महादेव फटींग वय ३२ वर्ष राह. पाचगाव हे सहकर्मी सह पेट्रोलिंग करीत असतांना १) मिथुन मनी नडार राह. मनसर २) मनिष सिंग राह. कन्हान, ३) विक्की यादव राह. कन्हान ४) कुणाल गणपत कठोके राह. टेकाडी या चार आरोपींनी संगणमत करून वेकोलि ( डब्लु सी एल) गोंडेगाव येथील २ टन कोळसा प्रत्येकी ५००० रुपये टन प्रमाणे एकुण १०,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून डुमरी शिवारात अवैधरित्या कोळसा टालवर साठवुन ठेवलेला आढळुन आल्याने सदर डब्लु सी एल चा चोरलेला दगडी कोळसा जप्त करून गोंडेगाव खदान येथे वजन करून जमा केला व काटा पावती सह कन्हन पोस्टे ला फिर्यादी राकेश फटींग यांच्या तक्रारी वरून १) मिथुन मनी नडार २) मनिष सिंग, ३) विक्की यादव ४) कुणाल कठोके या चारही आरोपी विरुद्ध कलम ३७९, ३४ , १०९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टे शनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्श नात कन्हान पोलीस करीत आरोपीचा शोध घेत आहे.

३) टेकाडी शिवारातुन बारा चाकी ट्रक व ३ टन चोरीच्या कोळसा पकडला.

वेकोलि कामठी उपक्षेत्र खुली कोळसा खदान सुरक्षा रक्षक शुभम केसरीचंद खंगारे वय २८ वर्ष राह. पिपरी हे सह कर्मीसह कर्तव्य पार पाडत पेंट्रोलिंग करित असताना टेकाडी शिवारात नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा लगत रविवार (दि.१३) मार्च च्या पहाटे ४ ते ४:३० वाजता दरम्यान बारा चाकी ट्रक क्र. एम एच ४० वाय ९२४४ मध्ये चोरीचा ३ टन कोळसा भरून नेताना मिळुन आल्याने बारा चाकी ट्रक किंमत १० लाख रूपये, ३ टन चोरीचा दगडी कोळसा किंमत १५ हजार रूपये अशा एकु़ण १० लाख १५ हजार रूप याचा मुद्देमाल जप्त करून कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी वेकोलि सुरक्षा रक्षक शुभम खंगारे यांनी तक्रार दाखल केल्याने कन्हान पोलीसानी आरोपी १) मंगलसिंह छत्रभोज मेहरा वय ४० वर्ष राह. समता नगर नागपुर २) भुजंग जनार्धन महल्ले वय ४५ वर्ष राह टेकाडी यांचे विरूध्द कलम ३७९, १४, १०९ भादं वि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित असुन आरोपीचा शो़ध घेत आहे.

४) महामार्गावरील बंद टोल नाका समोरून ४ टन २० हजार रूपयाचा चोरीचा कोळसा पकडला.

रविवार (दि.१३) सकाळी ९ ते ९:३० वाजता दरम्यान वेकोलि सुरक्षा रक्षक देवीप्रसाद बाबुलाल देविया वय ३३ वर्ष राह. खंदान नं.६ यांचा सहकर्मी रमाकांत नागपुरे हा कर्तव्यावर असुन पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना दिसुन आले कि, नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील बंद टोल नाका, महा मार्ग वाहतुक पोलीस टेकाडी कॅम्प च्या समोरील सर्व्ही स रोड लगत अवैद्य टालवर भुजंग महल्ले वय ४५ वर्ष राह टेकाडी वेकोलि कामठी उपक्षेत्र येथील ४ टन कोळसा चोरीचा साठवुन ठेवल्याचे आढळुन आल्याने प्रत्येकी ५ हजार रू टन किंमत २० हजार रूपयाचा चोरीचा कोळसा जप्त करून कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी वेकोलि सुरक्षा रक्षक देवीप्रसाद देविया यांचे तक्रारीने कन्हान पोलीसानी अवैद्य कोळसा टाल चालक भुजंग महल्ले यांचे विरूध्द कलम ३७९ भादं वि अन्वये गुन्हा दाखल करून पुृढील तपास कन्हान पोलीस निरिक्षक संजय काळे यांचे मार्गदर्शनात कन्हा न पोलीस पुढील तपास करित असुन आरोपीचा शोध घेत आहे.

५) राष्ट्रीय महामार्गावरील डुमरी शिवारात अवैद्य चोरीचा ४ टन कोळसा पकडला.

रविवार (दि.१३) मार्च २०२२ ला १ ते १:३० वाजता दरम्यान वेकोलि सुरक्षा रक्षक छत्रपाल बहादुर राजपुत वय २३ वर्ष राह. गोंडेगाव काॅलोनी हे सहक र्मी सह पेट्रोलिंग करीत असतांना नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील डुमरी शिवारात आरो पी १) बादल अशोक चवरे, २) आकाश अशोक चवरे दोन्ही राह. वार्ड क्र.१ कांद्री हयानी आरोपी ३) उमेश पानतावने यांच्या सांगणे वरून वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदान येथील ४ टन कोळसा प्रत्येकी ५००० रुपये टन प्रमाणे एकुण २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून अवैधरित्या साठवुन ठेवला होता व त्यास घेऊ न जाणार होते. अश्यातच मिळुन आल्याने वेकोलि गोंडेगाव चा ४ टन चोरीचा दगडी कोळसा जप्त करून फिर्यादी छत्रपाल बहादुर राजपुत याच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी आरोपी १) बादल अशोक चवरे, २) आकाश अशोक चवरे दोन्ही राह. वार्ड क्र.१ कांद्री आरोपी ३) उमेश पानतावने राह. कांद्री या तिन्ही विरुद्ध कलम ३७९ , ३४, १०९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Advertisement