Published On : Sun, Mar 21st, 2021

तो बिनधास्त, पण वडिलांच्या हृद्याचा ठोका चुकला!

Advertisement

– मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अशीही मानवंदना
-आरपीएफ जवानाच्या मुलाने केला विक्रम
– १८ किमीचा प्रवास ४.२९ तासात पूर्ण
-एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंतचा प्रवास

नागपूर: पाण्यात पोहण्याचा मोह युवकांना आवरता येत नाही. मात्र, सर्वत्र पाणी पाहून देव आठवतो. लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ इच्छा असून उपयोग नाही तर आत्मविश्वास लागतो. ध्येय तोच गाठतो ज्याच्या स्वप्नात उमेद आणि आत्मविश्वास असतो. १४ वर्षाच्या मुलानेही आत्मविश्वासाच्या बळावर यशाचे शिखर गाठले. १८ कि.मीचा प्रवास केवळ ४.२९ तासात पूर्ण केला. मुलगा अथांग पाण्यात पोहणार या विचारानेच आई वडिलांचे डोळे पाणावले. मुलाने उडी घेताच त्यांच्या हृदयाचा ठोका चुकला होता. मुलाने यश गाठताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रृ तरळले.

Gold Rate
Friday 07March 2025
Gold 24 KT 86,300 /-
Gold 22 KT 80,300 /-
Silver / Kg 97,700 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

परेश विजय पाटील असे त्या साहसी मुलाचे नाव आहे. तो इयत्ता ९ वीचा विद्यार्थी आहे. वडिल विजय पाटील मध्य रेल्वेच्या आरपीएफला आहेत. शेतकरी कुटुंबातील विजयने आरपीएफमध्ये अनेक धाडसी कारवाया केल्या. कोराना काळात डॉक्टर, परिचारीका, पोलिस, स्वच्छता दुत आदी कोरोना योध्दाचा सन्मान करण्यात आला. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कोणीही सॅलुट दिली नाही. त्यामुळे परेश पाटीलने एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत समुद्रात पोहून आगळी वेगळी मानवंदना देण्याचा संकल्प केला.

रविवारी सकाळी ५ वाजता त्याने पाण्यात उडी घेतली.  ठरल्या प्रमाणे १४ किमीचा हा प्रवास होता. मात्र, नेव्हीचे काही जहाज येत असल्याने ऐनवेळी मार्गात बदल करण्यात आला. एलिफंटा ते व्हाईट हाउस आणि व्हॉईट हाउस ते गेट वे ऑफ इंडिया असा १८ कि.मी.चा प्रवास त्याने केवळ ४. २९ तासात पूर्ण केला. या धाडसी आणि साहसी कार्याने मध्य रेल्वे झोनचे आरपीएफ आयजी अजय सदानी यांनी त्याचे कौतुक करून सत्कार केला. या प्रसंगी नवी मुंबई मेट्रोचे प्रभारी नामदेव रबडे, आरपीएफ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विविध संस्था संघटनांतर्फे परेशचे कौतुक करण्यात आले. प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.

Advertisement