कामठी :-आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस 12मे हा संपूर्ण जगात परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो .याच पाश्वरभूमीवर (आज12मे) ला जागतिक परिचारिका दिनानिमित्त कोराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पंचायत समिती च्या गटविकास अधिकारी अंशुजा गराटे , तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या हस्तेव परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करीत केक कापून जागतिक परिचारिका दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.यावेळी बीडीओ अंशुजा गराटे
यांनी आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगल यांच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकीत आपले विचार व्यक्त करीत समस्त परिचरिकाना आजच्या जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या. व आजच्या कोरोना महामारीत स्वताच्या जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा पुरविणाऱ्या आरोग्य सेविकांचा सत्कार करून मनोबल वाढविण्यात आले.
याप्रसंगी आरोग्य विस्तार अधिकारी दिघाडे यासह समस्त परिचरिकागण व रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी गन उपस्थित होते.