बेला : प्राथमिक आरोग्य केंद्र बेला येथे एम्स हॉस्पिटल नागपूर यांनी हृदयरोग व मानसिक आजार रोगाचे एक दिवसीय शिबिर दिनांक 4 ऑक्टोबर 2023 ला आयोजित केले होते. बदलत्या जीवनशैली मुळे होणारे मानसिक आजार व बदललेल्या खानपानाच्या सवयी यामुळे हृदय रोगाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये याचे प्रमाण जास्त असल्याकारणाने एम्स हॉस्पिटल नागपुर यांनी बेला प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड करत बेला येथे हा कॅम्प दिनांक 4 ऑक्टोबर रोज बुधवार ला आयोजित केला.
या शिबिराला बेला,सावंगी, पिपळा, खुरसापार, पवनी, कळमना, दहेली, सोनेगाव,, आष्टा, येथील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरांमध्ये पुरुष आणि स्त्रियांनी आपल्या हृदयाचे चेकअप करत औषध उपचाराचा सल्ला वरिष्ठ डॉक्टरांकडून घेतला. एम्स रुग्णालयाने ईसीजी मशीनची ची सोय करून आवश्यक 35 रुग्णांनी इसीजी करून घेतला. रुग्णांना आवश्यक मार्गदर्शन डॉक्टर घोषाल हेड ऑफ द डिपार्टमेंट कॉरिडोलॉजी विभाग एम्स, यांनी देऊन औषध उपचाराचा सल्ला दिला.
त्याचबरोबर मेंटल हेल्थ डिपार्टमेंट एम्स नागपूर या डॉक्टरच्या चमूनी रुग्णांना मार्गदर्शन केले व महिन्याच्या पहिल्या बुधवारी बेला प्राथमिक आरोग्य केंद्रात एम्स नागपूरच्या नामांकित डॉक्टरांना बोलवून त्यांच्याकडून मानसिक संतुलन बिघडलेल्या रुग्णांना इथेच तपासणी करून औषध उपचार केले जातील असे डॉक्टर सुयोग जयस्वाल हेड ऑफ द डिपार्टमेंट सायकॉलॉजी विभाग एम्स नागपूर. यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलून दाखविले यामध्ये डॉक्टर सायली दाबेराव असिस्टंट प्रोफेसर, डॉक्टर धनश्री गोहाड सीनियर रेसिडेंट ऑफिसर यांनी मानवसोपचार रुग्णांना या कॅम्पमध्ये सेवा दिली.
हृदयरोग विभागाचे मुख्य डॉक्टर घोशाल,डॉक्टर जया, डॉक्टर देवप्रिया, डॉक्टर आयुषी रामटेके, डॉक्टर निधी. या डॉक्टरच्या चमूने बेला आणि जवळपासच्या सर्व रुग्णांना तपासून योग्य ते मार्गदर्शन आणि खानपणाविषयीच्या संदर्भात मार्गदर्शन करून बेला प्राथमिक आरोग्य केंद्रातील या शिबिराची सांगता केली, कर्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर घोषाल यांनी. प्राथमिक आरोग्य केंद्र बेला याच्या सर्व कर्मचाऱ्यांचे छोटे खानि शिबिर घेत जर एखाद्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला असेल तर त्याला सीपीआर देऊन कसे वाचवता येईल याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. हृदयरोगाच्या रुग्णाला दवाखान्यात जात पर्यंत आपण सीपीआर द्वारे कसे वाचवू शकतो व रुग्ण सेवा करू शकतो हे मोलाचे मार्गदर्शन केले.
या शिबिराला ज्यांनी मोलाचे सहकार्य केले ते डॉक्टर जे पी त्रिपाठी एम्स नागपूर, डॉक्टर कोशिनी मंडीये, डॉक्टर सोनाली वानखेडे, घुटके, नागोसे , बेला प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या आरोग्य सेविका व बेला प्राथमिक आरोग्य केंद्रातील संपूर्ण चमु यांनी सहकार्य केले.