नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना दिल्लीच्या कार्यालयात अज्ञान व्यक्तीकडून पुन्हा जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला आहे. यामुळे गडकरी यांची सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. त्यांच्या नागपूर वर्धा रोडवरील घर आणि सावरकर नगरातील कार्यालयाच्या बाहेर सशस्त्र पोलिस तैनात करण्यात आले आहे.
याअगोदरही गडकरी यांना नागपूरच्या कार्यालयात धमकीचा फोन आला आहे. संबंधित आरोपी कर्नाटकातील कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याला नागपूर पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. आता दिल्लीतील कार्यालयात धमकीची फोन घेल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज गडकरी यांचे नागपुरातील घर आणि कार्यालयाचा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. दोन्ही ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान गडकरी यांच्या दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील निवासस्थानी धमकीचा फोन आल्याची माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्याने दिली.