Advertisement
नागपूर : शहरात आज दुपारी अचानक विजांचा कडकडाट मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. तब्बल १ तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहर जलमय झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच वातावरणात गारवाही निर्माण झाला.
दुपारी दोनच्या सुमारास अचानक ढगांचा गडगडाट सुरू झाला.
काही वेळ ढगांचा गडगडाट झाल्यानंतर विजाही चमकल्या आणि त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. त्याचबरोबर प्रादेशिक हवामान विभागाने अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी दोन दिवसांचा यलो अलर्ट जारी केला आहे.