Advertisement
नागपूर : नागपूर जिल्ह्यात सोमवारी दुपारपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारीही सुरूच होता. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे नदी नाले पाण्याने तुडुंब भरले आहेत.अनेकांनी धोक्याचा टप्पाही ओलांडला आहे.
पाण्याची वाढती पातळी पाहता तोतलाडोहचे चार दरवाजे 0.3 मीटर पर्यंत उघडण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शहरात प्रचंड उकाडा वाढला होता. तापमानही 34 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. सोमवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.
अनेक दिवसानंतर तासभर धो-धो पाऊस बरसल्याने संपूर्ण शहरातील रस्त्यांवर काही वेळातच पाणी साचले. तर दुसरीकडे नागरिकांना उखाड्यापासून दिलासा मिळाला.