Advertisement
नागपूर : शहराच्या विविध भागांमध्ये दुपारी तीन ते चार वाजतादरम्यान गारांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सकाळपासून उन्हामुळे त्रस्त नागपूरकरांना दिलासा मिळाला.
आज दुपारी अचानक वादळ , वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला.तब्बल तासभर पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाल्याचे पाहायला मिळाले.
भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यामध्ये दिनांक २४ एप्रिल ते २८ एप्रिल २०२३ या कालावधीत वादळीवारा, वीज व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली होती. त्यामुळे हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला आहे.
या अनुषंगाने नागरिकांनी विषेशत: शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र अवकाळी पावसामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.