पॅन कार्ड क्लब लिमिटेड कंपनीचे संचालक चंद्रसेन भिसे व शोभा भरडे यांना मुंबई उच्च न्यायालयच्या नागपूर खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
एफ आय आर गणेशपेठ पोलिस स्टेशन नागपूर येथे कलम ४२०, ४०६, ४०९ ३४ भादवी व कलम ३ एम पी आय डी अंतर्गत दाखल असून तपास आर्थिक गुन्हे शाखा नागपूर करीत आहे.
आरोप आशे आहेत:
पॅन कार्ड कंपनी चे ३० हॉटेल्स आहेत ज्यात काही पंचतारांकित आहेत. हे हॉटेल्स भारतात तसेच विदेशात सुद्धा आहेत. कंपनीचे इतर व्यवसाय जशे की रिसॉर्ट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, प्रॉपर्टी डेव्हलमेंट व कन्स्ट्रक्शन इत्यादी आहेत पॅन कार्ड क्लब कंपनीचे कार्यालय गणेशपेठ नागपूर येथे होते व मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. कंपनीने विविध निवेश योजना जाहीर केल्या व हजारो गुंतवणूकदरांकडून करोडो रुपये आमिष दाखवून घेतले. अपराध ७५०० करोड ते ७५००० करोड रुपयांच आहे. दोन्ही संचालकांचा जामीन अर्ज मंजूर होण्यास सरकार पक्षा चा सक्त विरोध होता. अर्जदार कंपनीचे संचालक आहेत, ते या अपराध पूर्ण पणे सहभागी आहेत, अपराध खूप गंभीर आहेत आणि अपराधाची व्याप्ती खूप मोठी आहे. तसेच अर्जदार यांच्या कडून नीवेश झालेले करोडो रुपये जप्त करायचे आहे व त्या करिता आरोपींची कस्टडी आवश्यक असल्याचे सरकार पक्षा कडून युक्तिवाद केल्या गेला. सेबी ने पारित केलेला कंपनीच्या विरोधातला आदेश सुद्धा दाखवल्या गेला.
अर्जदार यांच्या तर्फे असा युक्तिवाद केला गेला की अर्जदार नॉन एक्झिक्युटिव्ह इंडिपेंडंट डायरेक्टर आहेत त्यांचं व्यवस्थापनाशी काहीही संबंध नाही. त्यांच्या द्वारे कोणतीही गुंतवणुकीची योजना जाहीर नाही केल्या गेली. कंपनीचे ९१ स्थावर मालमत्ता रुपये २७९२ करोड ची जप्त आहे, ३३४ बँक खाते फ्रीज केल्या गेलेले आहेत, १५ इतर संपत्ती व चार कार विकून ११० करोड रिकवर केल्या गेलेले आहेत. अर्जदार वयस्कर आहेत.
दोन्ही पक्षांना ऐकून माननीय न्यायमूर्ती विनय जोशी यांनी अर्जदार तर्फे झालेला युक्तिवाद स्वीकृत केला व दोन्ही अर्जदार संचालकांना अटक पूर्व जामीन मंजूर केला.
आरोपी तर्फे:
अधिवक्ता समीर पी. सोनवणे व अधिवक्ता अमीत ठाकूर यांनी काम पाहिले.