Published On : Thu, Feb 20th, 2020

हिंगणघाट जळीतकांड | आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा

Advertisement

नागपूर : पंधरवड्यापूर्वी हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला जिवंत जाळून ठार मारणारा मारेकरी विकेश उर्फ विक्की नगराळे याने बुधवारी नागपूर कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. कारागृह प्रशासनाने मात्र यास नकार दिला असून या अफवा असल्याचे सांगितले आहे. विकेश नागपूर मध्यवर्ती कारागृहातील विशेष बराकीत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थंडीपासून बचाव करण्यासाठी विकेशला ब्लँकेट देण्यात आले आहे. बुधवारी दुपारी त्याने हे ब्लँकेट फाडले. त्याची एक चिंधी बराकीतील गजाला बांधली आणि ती गळ्यात अडकवून फास लावण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाच्या लक्षात आला. त्याने वेळीच धाव घेत विकेशच्या गळ्याभोवतीचा फास ढिला केला. यानंतर त्याला कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे कळते. या घटनेबाबत कारागृह प्रशासनाशी संपर्क साधला असता, विकेशने आत्महत्येचा कुठलाही प्रयत्न केला नाही. त्याच्या आत्महत्येचे वृत्त चुकीचे असल्याचा दावा केला.

Gold Rate
Tuesday 21 Jan. 2025
Gold 24 KT 79,700 /-
Gold 22 KT 74,100 /-
Silver / Kg 92,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळेची आज (19 फेब्रुवारी) न्यायालयीन कोठडीची मुदत संपत आहे. व्हिडिओ कॉन्फेरद्वारे न्यायालयात पेश की प्रत्यक्ष आणणार, हे अजून सांगितले नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीची व्हिडीओ कॉन्फरन्सने पेशी होण्याची शक्यता आहे.

विकेशने 3 फेब्रुवारीला कॉलेजमध्ये जात असताना पीडितेवर आरोपी विकेश नागराळेनं पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात पीडित शिक्षिकेचा चेहरा पूर्णपणे जळाला होता. श्वसननलिकेला देखील मोठी इजा झाली होती. डॉक्टरांनी वेळोवेळी शस्त्रक्रिया करुन पीडितेला वाचवण्याचा पुरेपर प्रयत्न केला होता. मात्र तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. १० फेब्रुवारी रोजी तिचा मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्र हादरला. पीडितेच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर दारोडाच्या ग्रामस्थांचा आक्रोश अनावर झाला होता. आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.

घटनेप्रकरणी आरोपी विकेश नगराळे याच्यावर सुरवातीला कलम 307, 326 (a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर यामध्ये 302 या कलमाची वाढ करण्यात आली आहे. प्रकरणाचा लवकर तपास करून प्रकरणात चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न असल्याचं पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी सांगितलं आहे. तसेच हिंगणघाट जळीत हत्याप्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement