कामठी :- हिंगणघाट येथील एका तरुणी प्राध्यापिकेला नंदोरी चौकात भर रस्त्यात दिवसाढवळ्या पेट्रोल टाकून जाळून मारणाऱ्या नराधमावर फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात कुठेही खुल्या बाटलीत पेट्रोल विकणाऱ्यावर बंदी घालून कायदेशीर कारवाही करावी तसेच कामठी शहरात उघडयावर किरकोळ पणे होणारी पेट्रोल विक्री थांबवित संबंधित पेट्रोल विक्रेत्यांवर कारवाही करण्यात यावी याबाबतचे निवेदन आज कामठी तहसिल कार्यलयात जिजाऊ वाचनालय कामठी च्या वतीने कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष व नगरसेवक काशीनाथ प्रधान, जिल्हा परिषद सदस्य प्रा अवंतीकाताई लेकुरवाडे, पंचायत समिती उपसभापती आशिष मललेवार, निखिल फलके यांच्या नेतृत्वात नायब तहसिलदार आर उके यांना सामूहिक निवेदन सादर करुन घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.
हिंगणघाट येथील तरुणी प्राध्यापिका महाविद्यालयात जात असताना विकेश नगराळे या 26 वर्षोय नराधमाने पेट्रोल टाकून भररस्त्यावर पेटवून दिले .यात ती तरुणी गंभीर जळाली असून मृत्यूशी झुंज देत तिने आज पहाटे 4 वाजता जगाचा अखेरचा निरोप घेत मरण पावली . या नराधम.आरोपीने माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य नियोजन बध्द पद्धतीने केले असून थंड डोक्याने केलेले कृत्य आहे. यासाठी या आरोपीला फशुचि शिक्षा व्हावी त्यासोबतच हा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा तसेच सरकारी वकील म्हणून प्रसिद्ध विधितज्ञ उज्वल निकम यांनी पीडितेची बाजू न्यायालयात मांडून पीडीतेला न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी जिजाऊ वाचनालय चे उमेश तडसे, सोनू सूर्यवंशी, प्रदिप साखरकर, अनवर हैदरी, चेतन उमरे, तेजस नरखेडकर, बंटी मते, अपूर्वा अहिर, अश्विनी चकोले, अश्विनी अवचट, अश्विनी दुपारे,भागीरथी डोंगरे, स्नेहल काटकर, रविना लांजेवार, इंडेना कौसर, कल्याणी वानखेडे, हर्षलता रहाटे,नेहा पाटील, गौरव मेश्राम, सय्यद अस्कर, रोहित गजभिये, मनीष रंगारी, अमित बोरकर, अतुल कनोजिया, पवन लांजेवार, शुभम खरोले, खुशाल लांजेवार जिवन यादव आदी उपस्थित होते
संदीप कांबळे कामठी