– १६ जून रोजी समापन कार्यक्रम
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत समग्र शिक्षा-समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत दिव्यांग मुलांच्या सर्वांगीण विकास होण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असलेल्या व शाळाबाहय दिव्यांग मुलांकरिता धंतोली स्थित यशवंत स्टेडियम, क्रीडा प्रबोधिनी सभागृहात ग्रीष्मकालीन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. येत्या १६ जून रोजी या ग्रीष्मकालीन शिबिराचे होणार असून, आजवर विद्यार्थी व पालकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे. अशी माहिती मनपाचे शिक्षणाधिकारी श्री. राजेंद्र पुसेकर यांनी दिली.
मनपाचे शिक्षणाधिकारी श्री. राजेंद्र पुसेकर यांनी सांगितले की, मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग मुलांकरिता ग्रीष्मकालीन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष गरजा असणाऱ्या मुलांना शिक्षणाबरोबरच संगीत, नृत्य नाटय सांस्कृतिक कला व क्रीडा क्षेत्रात सुध्दा समान संधी प्राप्त व्हावी, यासाठी त्यांच्या सुप्त कलागुणांना चालना मिळण्याकरिता व तसेच दिव्यांग मुलांचा सर्वांगिण विकास होण्याकरिता त्यांना संगीत, नृत्य, शारीरिक शिक्षण व क्राफ्ट टीचरच्या माध्यमातून विशेष प्रशिक्षण देण्यात आल्यास दिव्यांग विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होणे शक्य आहे. याच उद्देशाने नागपूर महानगरपालिका अंतर्गत येत असलेल्या मनपा/ जिप शाळेमध्ये शिकत असलेल्या व शाळाबाहय ६० ते ७० दिव्यांग विद्यार्थ्यांना एक महिण्याच्या कालावधी मध्ये ग्रीष्मकालीन शिबीराचे आयोजन करण्यात आले. ग्रीष्मकालीन शिबीराकरिता शहरातील दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था मधून तसेच संगीत, नृत्य, योगा- स्पोर्ट्स, आर्ट अँड काफ्ट या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी विशेष गरजा असणान्या विद्यार्थ्यांना त्यांच्यातीन सुप्तगुण शोधून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थ्यांसह पालकांनीही शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ते सर्वांचा उत्साह वाढविला. दिव्यांग विद्यार्थी तर शिबीरात इतके रमले आहेत की, घरी जायला तयार नाही. शिबीरामुळे दिव्यांग विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव तर मिळतच आहे, पण सोबतच त्यांचा Self Confidence, Socialization, Communication, Concentration, Vocational, Eye-Hand Coordination, Entertainment इ. गुणांमध्ये विकास होण्यास मदत होत आहे. तसेच मानसोपचार तज्ज्ञां मार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांचे वर्तणूक समस्येचे निवारण व व्यवस्थापन आणि Good Touch, Bad Touch याची जाणीव, अतितीव्र दिव्यांग विद्यार्थ्यांना फिजीओथेरेपीस्ट तज्ज्ञांमार्फत फिजीओथेरेपी देण्यात येत आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिबीर सुरु असतांना पालकांना देखील आम्ही विविध उपक्रमात त्यांचा सहभाग करुन घेत आहोत. पालक सुध्दा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या संगीत, नृत्य, योगा स्पोर्ट्स, आर्ट अँड क्राफ्ट यामध्ये सहभागी असल्याचेही श्री. पुसेकर यांनी सांगितले. याशिवाय शिबीराला मनपा व जि.प शिक्षणाधिकाऱ्यांनी भेट देवून दिव्यांग विद्यार्थी, पालक व कर्मचारी यांचा उत्साह व्दिगुनीत केला आहे.
पालकांचे विशेष मार्गदर्शन
शिबिरात पालकांना विविध विषयावर समन्वयक / विशेषतज्ञ / विशेष शिक्षक तसेच तज्ञव्यक्ति यांचेद्वारे सुपदेशन व मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच पालकांना दिव्यांग क्षेत्रातील राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना जसे- प्रवासभत्ता, मदतनिसभत्ता, शिष्यवृत्ती, संजय गांधी निराधार योजना, निरामय योजना, दिव्यांग प्रमाणपत्र, रेल्वे सवलत, बस सवलत, बुध्दिगुणांक चाचणी, फिजीओथेरेपी, स्पीचथेरेपी, ब्रेल बुक, लार्जप्रिंट पुस्तके, साहित्य व साधणे (कॅलीपर, व्हीलचेअर, क्लचेस, कुबडया, कृत्रिम अवयव, टॅब, लॅपटॉप इ.) अशा विविध योजनांचा लाभ कशाप्रकारे व कोठून घ्यावयाचा याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क प्रमुख :
श्री. अभिजीत राऊत: – ९८२३९३४०७०.
श्री. अमोल अंभोरे:- ९६७३००७९४४.
कु. करुणा वजारी:- ९४०४०८०२९०.
श्री. विजय चवळे:- ९७६६२८४६०७.