नागपूर: अन्याय – अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शुद्रातिशुद्र समाजाची मुक्तता करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना करुन ज्यांनी संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षणासाठी वेचले असे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त उपमहापौर दीपराज पार्डीकर, झोन सभापती प्रमोद चिखले व नगरसेविका हर्षला साबळे यांनी सकाळी महात्मा फुले मार्केट स्थित महात्मा फुले यांच्या प्रतिमेला म.न.पा.च्या वतीने पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
यावेळी माजी नगरसेविका रश्मी फडणवीस, मीरजा पाटील, मधुसुदन देशमुख, वामन सोमकुवर, शिवराम गुरुमुळे, अभय बावने, बबलु दोबोले आदी उपस्थित होते.
तसेच म.न.पा. केंद्रीय कार्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीतील दालनात उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी महात्मा फुले यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
सेनापती बापट यांच्या स्मृतीदिना निमित्त उपमहापौर व्दारा अभिवादन
सेनापती बापट यांच्या स्मृतीदिना निमित्त मा. उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी सकाळी नागपूर विदयापीठ ग्रंथालय समोरील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंग अखंड महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष मधुकराव कुकडे उपस्थित होते.