Advertisement
कामठी:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनी रहिवासी होमगार्ड नरेश कडबे याच्या एका 22 वर्षीय मुलीने अज्ञात कारणावरून आज भरदिवसा 2 दरम्यान घरातील सिलिंग फॅन ला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली असून मृतक तरुणीचे नाव प्रणाली नरेश कडबे वय 22 वर्षे रा कुंभारे कॉलोनी कामठी असे आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पूढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलवित मृतकेच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले.यासंदर्भात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.मृतक तरुणी अविवाहित असून हिच्या पाठीमागे आई, वडील, एक भाऊ असा आप्तपरिवार आहे.