Published On : Sun, Apr 5th, 2020

कोरोना रुग्णासाठी लढणाऱ्या योध्यासाठी हॉटेल सेन्टरपॉइंट ची सेवा

Advertisement

डॉक्टर ,सहकर्मचाऱ्यांना गेस्टरूम, भोजनाची सुविधा
हॉस्पिटल ते हॉटेल प्रवास सुविधा
डॉक्टरांच्या सेवेला सलाम

File Pic

नागपूर: करोना सारख्या संसर्गजन्य आजारापासून जनतेच्या सुरक्षेसाठी डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र अविरत सेवा देत आहेत, अशा रुग्णासाठी सेवा देताना प्रसंगी धोका सुध्दा स्वीकारून सेवरूत्तीने आज कार्यरत आहेत, अशा सर्वांसाठी येथील सुप्रसिद्ध हॉटेल सेंटर पॉईंट Hotel Center Point ने रहाणे, जेवण यासाठीची जबाबदारी स्वीकारली आहे,

कोरोना मुळे संपूर्ण जगात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे, भारतातही प्रत्येकाच्या मनात भितीचे वातावरण आहे, अशा वातावरणात डॉक्टरांनी आपली जबाबदारी स्वीकारली आहे, त्याच्या सेवेला सलाम करतानाच हॉटेल सेंटर पॉईंट तर्फे या मेडिकोजला ऑफ ड्युटी सर्व सुविघ साठी उपलब्द असल्याचे पत्र विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांना जसबीर सिंग अरोरा यांनी दिले आहे, ही सुविधा आजपावून उपल्बध करून दिली आहे.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर सह मध्यभारतातील कोरोना रुग्णाला अहोरात्र सेवा देताना जनतेसाठी प्रसंगी स्वतः धोका सुद्धा स्वीकारण्यास मागेपुढे पहात नाहीत अशा योध्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट ने ऑफडूटी सेवा, तसेच त्यांना यासाठी पोलीस विभागाच्या परवानगीने वाहन व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे,
कोरोना रुग्णाला सेवा सेवा देताना स्वतःच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कामाचे तास संपल्यावर स्वतःला दूर ठेवतात, अशा परिस्थितीत त्यांची सेवा करण्याची जबाबदारी सर्वसामान्यांची आहे, ही जबाबदारी हॉटेल सेंटर पॉईंट स्वीकारत असल्याचे जसबीर सिंग अरोरा यांनी विभागीय आयुक्त संजीव कुमार यांना कळविले आहे,जिल्हा प्रशासनाच्या करोना संदर्भातील गरजू व्यक्तीच्या सेवेसाठी आलेली जबाबदारी स्वीकारन्याची तयारी असल्याचे श्री अरोरा यांनी सांगितले आहे.

Advertisement