Advertisement
ry
नागपूर – वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवनाथ नगरमध्ये भरदिवसा घरफोडीची घटना घडली. फिर्यादी विठ्ठलराव रामकृष्णजी डचरे (वय ६५), रा. प्लॉट क्र. १००, नवनाथ नगर, वाठोडा, नागपूर हे १४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १.३० ते २.५७ या वेळेत आपल्या कुटुंबासह मुलीसाठी स्थळ पाहण्याच्या उद्देशाने घर बंद करून बाहेरगावी गेले होते.
त्यांच्या अनुपस्थितीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजावरील कुलूप व सेंट्रल लॉक तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूममधील आलमारीतील रोख रक्कम रुपये ५,००,००० आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण सुमारे ७,९३,००० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी विठ्ठलराव डचरे यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे वाठोडा येथे पोलीस उपनिरीक्षक ठाकरे यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.